अभिनेता इरफान खानने जवळपास वर्षभर न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. मात्र या लढ्यात त्याची तब्येत पूर्णपणे खालावली आणि एका संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी त्याने अखेरचा मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं. त्याच्या जाण्याने मनोरंजनविश्वाची कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु इरफानचा अखेरचा प्रवाससुध्दा फारच निराशाजनक होणार आहे.
पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, जगभर आणि देशात करोनाचं संकट ओढवल्याने लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे इरफानच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त पाच जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.यामुळे त्याच्या शेवटच्या प्रवासात सामिल होता न येण्यासारखं मोठं दु:ख चाहत्यांना झालं आहे. अंधेरीतील वर्सोवा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. दुपारी ३ वाजता हे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. साश्रूनयनांनी कुटुंबिय व आप्तेष्टांनी त्याला भावपूर्ण निरोप देतील.
करोना संकट ओढवल्यामुळे अंत्ययात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. कारण, यामुळे चाहत्यांची मोठी गर्दी उसळेल. व करोना संकट काळात ही परिस्थिती हाताळणं कठीण जाईल.
दरम्यान, पत्नी सुतापा आणि मुलं बाबिल आणि अयान हे हॉस्पिटल बाहेर पहायला मिळाले.