By  
on  

PeepingMoon Exclusive : इरफानच्या शेवटच्या ७२ तासांत कुटुंबियांना कल्पना आली होती की ते त्याला गमावणार

अभिनेता इरफान खानने जवळपास वर्षभर न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी यशस्वी लढा दिला. मात्र या लढ्यात त्याची तब्येत पूर्णपणे खालावली आणि colon infection मुळे रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी त्याने जगाचा निरोप घेतला. एखाद्या डॅशिंग हिरोसारखा दित नसूनही केवळ दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. अंग्रेजी मिडीयम हा इरफानचा अखेरचा सिनेमा ठरला. करोना लॉकडाऊनमुळे रिलीज झाल्यानंतर दुस-यादिशीपासून थिएटर्स बंद झाल्याने त्याच्या अखेरच्या सिनेमाला न्याय मिळाला नाही. ६ एप्रिल रोजी हा सिनेमा डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. त्यानंतर काहीच दिवसांनी इरफानची प्रकृती खालावली. 

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, डॉक्टरांनी इरफानची तब्येत खुपच ढासळल्याचं कुटुंबियांना सांगितलं होतं. त्यानंतर कोविड-१९ चं थैमान सुरु झालं होतं, तसंच लॉकडाऊनही सुरु होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने मग तातडीने इरफानला कोकिलाबेन धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जर ऐनवेळेस तब्येत खुपच बिघडली तर हॉस्पिलमध्ये नेण्यास अडचण निर्माण होईल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. 

कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये इरफान खानला दाखल करण्यात आलं. त्याची करोना चाचणी ही खबरदारीसाठी घेण्यात आली. तसंच एका जवळच्या सूत्रांनुसार तो मध्येमध्ये आजबाजूंच्या माणसांना कुटुंबियांना ओळखेनासा झाला होता.थोडाफार विस्मृतीत गेला होता. 

बुधवारी इरफानची प्रकृती हाताबाहेर गेली होती. त्याला व्हेंटिलेटरव ठेवण्यात आलं होतं. इरफान काल रुग्णालयात अपयशी झुंज देत होता.संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान  इरफानला रिक्वहर होण्यासाठी २४ तास लागतील असं डॉक्टरांचं म्हटलं होतं. त्यांनी कुटुंबियांना घरी पाठवलं, पण मध्यरात्री इरफानची तब्येत खुपच  खालावली ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये परतले. जवळचे आप्तेष्टही होते. त्यानंतर सकाळी  १० च्या दरम्यान व्हेंटिलेटरवर असलेला इरफान उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला व त्याने जगाचा निरोप घेतला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive