. रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉयकपूर यांची निर्मिती असलेला हा सिनेमात सर्वप्रथम आमीरची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण आमीरने शाहरुखचे नाव या व्यक्तिरेखेसाठी योग्य असल्याचं सुचवलं होतं. पण हो नाही करत शाहरुखनेही या सिनेमाला नकार दिला. मग सिनेमाच्या निर्मात्यांनी चौकटीबाहेर जात प्रस्थापित अभिनेत्यांच्या मागे लागण्याऐवजी नवीन चेह-यांना संधी देण्याचं ठरवलं. त्यामुळे या सिनेमात विकीची वर्णी लागली आहे.
पीपिंगमूनच्या वृत्तानुसार या सिनेमात आता शाहरुख ऐवजी विकी कौशल स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा जीवनपट साकारणार आहे. उरीमधील दमदार परफॉर्मन्समुळे विकीचं नाणं खणखणीत आहे. या बायोपिकला महेश मथाई दिग्दर्शित करणार आहेत. खरं तर या चित्रपटाचं या आधीचं नाव ‘सॅल्युट’ असं होतं. पण ते बदलून ‘सारे जहां से अच्छा’ असं करण्यात आलं.