By  
on  

Exclusive : दुर्देवी ! लेक रिध्दीमा कपूर वडील ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाही?

ऋषी कपूर यांचं निधन हे कपूर कुटुंबिय आणि चाहत्यांना चटका लावून जाणारं ठरलं आहे. इरफान खानच्या निधनाच्या वृत्ततून आपण सावरतो ना सावरतो तोच आज ऋषीजींच्या निधनाची बातमी येऊन ठेपली आणि सिनेसृष्टी पुन्हा शोकसागरात बुडाली. पण एक दुर्दैवी बाब म्हणजे, ऋषीजींची लाडकी लेक रिध्दीमा कपूर सहानी ही त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला येऊ शकणार नाही. ती लग्नानंतर दिल्लीतच वास्तव्यास आहे. पण आता करोना संकटामुळे देशभर सर्व विमानसेवा बंद असल्याने तिला येथे येण्याचा मार्गच उपलब्ध नाहीय. 

तसंच ऋषीजींच्या अंत्यसंस्काराबाबतची कुठलीच माहिती अद्याप उलगडलेली नाही.  लवकरच त्याबाबतचं वृत्त येईल.  आपण ऋषीजींच्या निधनाच्या बातमीवर विश्वास ठेऊ शकत नाही, पण रिध्दीमाची लेक व समारा म्हणजेच ऋषीजींची नात त्यांच्याबाबतच्या या वृत्ताला धैर्याने सामोरी गेलीय. समारामध्ये ऋषीजींचा खुप जीव होता. आजोबा-नातीची जोडी खुपच धम्माल करायचे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive