बुधवारी चाहत्यांनी इरफान खानला गमावल्यानंतर आज गुरुवारची सकाळ उजाडली ते बॉलिवुडवर दुसरा आघात करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त सर्वप्रथम सर्वांसमोर महानायक अमिताभ बच्चन यांनी आणलं. 'तो गेला..मी उध्द्वव्स्त झालोय,' अशा शब्दात त्यांनी आपल्या जिगरी दोस्ताच्या जाण्याची दु:खद वार्ता सर्वांपर्यंत पोहचवली. आता हाच जिगरी दोस्त ऋषीजींना अंतिम निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी अंत्यसंस्कार विधीसाठी फक्त २० जणांनाच परवानगी दिली आहे. करोना पार्श्वभूमीवर पोलिसांनी कपूर कुटुंबियांना फारच शांततेने अंत्यविधी पार पाडण्याची विनंती केली आहे.
खरंतर, भारतीय सिनेमासाठी आपलं योगदान देणा-या या महान नटाचं मोठ्या सन्मानाने अंतिम प्रवास व्हावा अशी चाहत्यांची इच्छा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण होऊ शकत नाही.
कभी- कभी, अमर अकबर एंथनी, नसीब, कुली, अजूबा आणि 102 नॉट आउट अशा अनेक सिनेमांमध्ये बिग बी व ऋषी कपूर यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी ते उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.