By  
on  

#Exclusive: फोनवरुन वडिलांच्या निधनाचे वृत्त बहिणीला सांगताना रणवीरच्या अश्रूंचा बांध फुटला

ऋषीजींच्या निधनाचं वृत्त कुटुंबियांना सांगणं नितू कपूर व रणबीर कपूर यांना खुपच जड गेलं. पिपींगमूनला मिळालेल्या, एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार रणबीर कपूर हा बहिण रिध्दीमाला वडिलांच्या निधनाची बातमी सांगताना पूर्णपणे कोलमडून गेला होता. त्याला शब्दच सुचत नव्हते...कसंतरी स्वत:ला सावरत त्याने फोन आई नितूकडे दिला. आधीच धक्कयातून न सावरलेल्या नितू कपूर यांनी मुलीला ही दुर्देवी बातमी दिली व दोघी एकमेकींचं सांत्वन करु लागल्या. 

कदाचित ऋषीजींना आपला शेवट कळून चुकला होता म्हणूनच बुधवारी रात्री उशीरा ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरला आयसीयूमध्ये बोलावलं. त्यांच्या पलंगाशेजारी बसायला सांगितलं. तर पत्नी नितू कपूर या सतत ऋषी कपूर यांच्यासोबतच असायच्या. कोणालाही त्यांना भेटायची परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती.

आज सकाळी ८.४५ वाजता त्यांनी आपले प्राण सोडले. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive