कुंभमेळ्यात आज शिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘ब्रम्हास्त्र’चा फर्स्ट लूक होणार प्रदर्शित

By  
on  

महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात महाशिवरात्रीचं पर्व मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. त्यामुळेच ‘ब्रम्हास्त्र’च्या मेकर्सनीही या सिनेमाचा पहिला लूक आज रिलीज करण्याचं ठरवलं आहे.

https://twitter.com/aliaa08/status/1102488014440288256

पीपिंगमूनच्या सुत्रांनुसार प्रयागराज (अलाहाबाद) येथे  कुंभ मेळ्याची सुरुवात १४ जानेवारीपासून झाली होती. आज म्हणजे महाशिवरात्रीदिवशी त्याचा समारोप आहे. पुराणांच्यानुसार, याचदिवशी भगवान शंकर ब्रम्हाच्या शरीरापासून रुद्र रुपात प्रकट झाले होते. त्यामुळेच या दिवसाला महाशिवरात्री म्हटलं जातं.  याच दिवशी शिव-पार्वतीचं लग्न झालं होतं.

https://twitter.com/karanjohar/status/1102456601590419457

करण जोहरने सकाळीच एक ट्वीट करून आजच्या दिवसाची घोषणा केली होती. आलियानेही याबाबतीत ट्वीट केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. या सिनेमात आलिया भट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय मौनी रॉयदेखील एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे.

Recommended

Share