Exclusive: गुलाबो सीताबो: घरमालक व भाडेकरुच्या आंबट-गोड नात्यांवर आधारित आहे ट्रेलर

By  
on  

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सीताबो' सिनेमाची इंडस्ट्रीसह चाहत्यांनासुध्दा प्रचंड उत्सुकता आहे. आता तर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन जगभर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पिपींगमूनला या सिनेमाचा एक्सक्ल्युझिव्ह ट्रेलर पाहण्याची संधी मिळाली. दोन मिनिटे ४१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि राईजिंग सुपरस्टार आयुष्मान खुराना यांचा हा ट्रेलर पाहून तुम्ही १२ जूनला अॅमेझॉन ्पराईम व्हिडीओवर हा सिनेमा पाहण्यापासून स्वत:ला  रोखू शकणार नाहीत. 

एक घरमालक व त्याचा भाडेकरु यांच्यातील आंबट-गोड भांडण व त्यांच्या रुसव्या-फुगव्याच्या नात्यावर गुलाबो सीताबोच्या ट्रेलरमधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'विक्की डॉनर' आणि 'पीकू'  नंतर जूही चतुर्वेदी यांचा हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे.  एकूणच विनोदी धाटणीचं कथानक सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

 

सिनेमाला नवाबांचं शहर लखनौची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये अमिताब व आयुष्मान यांच्या व्यक्तिरेखांचं जे भांडण सुरु आहे, त्यामागे जामा मशीदचा परिसर पाहायला मिळतो. त्यांचं भांडण कोर्टापर्यंत जाऊन पोहचतं. 

या सिनेमात बिग बी चक्क  एका जर्जर झालेल्या  म्हाता-याची भूमिका साकारतायत. अभिनेता आयुष्मान खुरानासुध्दा बिग बींसोबत ह्या सिनेमात झळकतोय. प्रसिध्द दिग्दर्शक शूजित सरकार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

बच्चन साहेबांना त्यांच्या लूकसाठी प्रोस्थेटीक मेकअपचा वापर करावा लागायचा आणि  त्यासाठी बराच त्राससुध्दा सहन करावा लागायचा जवळपास दिसाचे दोन तास यासाठी खर्च व्हायचे. 

'गुलाबो सीताबो' चा येत्या १२ जून रोजी  Amazon Prime Video वर वर्ल्ड प्रिमियर होणार आहे

 

 

Recommended

Loading...
Share