By  
on  

PeepingMoon Exclusive: अक्षय कुमारने सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडकरांना लागली पुन्हा शुटिंग सुरु करण्याची ओढ

अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी आहे. अनेक अडचणींवर मात करत तो समोर येत असतो. आताही त्याने असाच मार्ग स्विकारला आहे. अक्षयने नुकतंच एक शुटिंग पुर्ण केलं आहे. त्याचा या ईदला रिलीज होणारा कॉमेडी हॉरर सिनेमा ‘लक्ष्मी बाँब’ डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायला तयार आहे. तर त्याच्या ‘सुर्यवंशी’ लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये गर्दी खेचायला तयार आहे. 

अक्षयने नुकतंच करोना जनजागृती करणा-या एका जाहिरातीचं शूटींग नुकतंच त्याने पार पाडलं.  करोनामुळे बंद असलेल्या सिनेसृष्टीत अक्षयच्या शुटच्या निमित्ताने पहिल्यांदाच शुटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयच्या या शूटने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सृष्टीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ‘यावर  बाल्की म्हणतात, ‘ आम्हाला कामाला पुन्हा सुरुवात करायला हवी. पण यासोबतच सुरक्षेच्या नियमांचं पालन स्वत:च्या आणि इतरांच्यासाठी करायलाच हवं. याशिवाय कमीत कमी  गर्दी, कडक नियम पाळून हे सहज करता येणं शक्य आहे.’ यावर अनेक सेलिब्रिटींनी पीपिंगमूनकडे मत व्यक्त केलं. 

फरहाद सामजी: पटकथा लेखक, दिग्दर्शक- 
आम्ही शुटिंग सुरु करण्यास उत्सुक आहोत पण सुरक्षा ही पहिली जबाबदारी आहे. सरकारच्या धोरणांवरही हे बरंचसं अवलंबून आहे. 

विवेक अग्निहोत्री: दिग्दर्शक- 
सिनेसृष्टी सुरळीत सुरु व्हावी असं वाटतं. त्यासाठी मी प्रयत्नही करत आहे. करोना हा अनोळखी आहे. लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे सध्या होणारी सुरुवातही आव्हानात्मक आहे. 

मुकेश छाब्रा: निर्माते आणि अभिनेते-
सध्या सुरक्षेचा विचार सर्वप्रथम आहे. सेटवर सॅनिटायझेशनची काळजी घेणं गरजेचं आहे. मी सध्या कास्टींग सुरु करण्याचा विचार करत आहे. इतके दिवस घरातून यावर काम केलं आहे. 

अभिषेक बनर्जी: अभिनेता- 
मी इतरांप्रमाणेच उत्सुक आहे. पण आरोग्यदायी वातावरणात शुट करणं आवडेल. शुटिंग लवकरच सुरु होईल याबाबत आशावादी आहे. 

चंकी पांडे: अभिनेता-  
आता आपल्या सगळ्यांनाच सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय स्वच्छतेचे मापदंड कटाक्षाने पाळणे महत्त्वाचं आहे. आपल्या चुकातून शिकणं खुप महत्त्वाचं आहे. कमीत कमी लोकांसह शुटिंग, क्रु मेंबर्सची तपासणी, हायजिनिक जागा यावर लक्ष केंद्रित करायला हवं. 

राजन शशी: टिव्ही दिग्दर्शक , निर्माते- 
आम्ही काही सुचना केल्या आहेत पण त्याबाबाबत अजुन काही समोर आलं नाही. सरकारकडून सुचना आल्यावर पुढे जाणं योग्य ठरेल. पण नेहमीप्रमाणे शुटिंग सुरु करता येणार नाही. 

कृतिका कामरा: अभिनेत्री- 
मी शुटिंग सुरु होण्याची वाट पाहात आहे. पण काही काळजी घेऊन हे सुरु करता येणं शक्य आहे. प्रत्येकजण याबाबत जागरुक आहे याचा आनंद आहे. 

रवी दुबे: अभिनेता आणि सुत्रसंचालक- 
परिस्थिती पुर्वीइतकी सरळ राहिली नाही. पण प्रवाहासोबत पुढे जाणं गरजेचं आहे. सध्या थेट संपर्क टाळून याबाबत सजग राहता येणं शक्य आहे. काही कालावधीने पुन्हा शुट सुरु करायला हवं. 

सरगुन मेहता: अभिनेत्री- 
प्रत्येक समस्येवर धाडसाने मार्ग काढणं गरजेचं आहे. आता हताश होऊन चालणार नाही. यावेळी पडद्यामागे काम करत असलेल्या कामगारांच्या हिताचाही विचार करायला हवा. 

निकितीन धीर: अभिनेता‌- 
सध्या काय सुरु आहे याबाबत मी इतरांइतकाच अनभिज्ञ आहे. सगळ्या बाबी सुरु होतील. फक्त त्यासाठी वाट पाहायला हवी. 

अमी पटेल: सेलिब्रिटी स्टायलिस्ट- 
सध्या सगळेच घरी आहेत. पण लवकरच सुधारित गाईडलाईन्स नुसार सगळे काळजी घेऊन काम करतील. जग थांबू शकणार नाही त्यामुळे आपणच सुरक्षेचे नवे उपाय अवलंबायला पाहिजेत. 

आकांक्षा कपूर: टिव्ही सेलिब्रिटी स्टयलिस्ट- 
कमीत कमी लोकांसोबत काम करणं हाच यावरचा उपाय आहे. 

तरन आदर्श: ट्रेड अ‍ॅनालिस्ट- 
सध्या सगळं सुरु करणं खुप घाईचं होईल. आपण वेट अ‍ॅण्ड वॉच परिस्थितीमध्ये आहोत. सरकारने शूटिंगला हिरवा कंदील दाखवला असला तरी काही अटींचं पालन करणं गरजेचं आहे. सेटवर कमीत कमी लोक ठेवणं, रोमॅंटिक सीन टाळणं गरजेचं आहे. सध्या सगळंच बदललं आहे.

 
अतुल मोहन: ट्रेड अ‍ॅनालिस्ट-
अक्षय कुमार आणि आर. बाल्की यांनी अवलंबलेला मार्ग अनुसरण्याची गरज आहे. कमीत कमी क्रु मेंबरसहित काम करावं. सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सही जरुर पाळाव्यात. 

Recommended

PeepingMoon Exclusive