सतत झगमगाटात असलेल्या बॉलिवूडला जशी कुणाची तरी नजर लागली आहे. यावर्षी अनेक सेलिब्रिटींनी अखेरचा निरोप घेतला. तर काहींनी आत्महत्येला कवटाळलं. अशीच एक बातमी सध्या पीपिंगमूनला समजली आहे. सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सलियनने 14व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे.
बंटी सजदेहच्या कॉर्नरस्टोनसाठी काम करणारी दिशा वरुण शर्मा आणि भारती सिंहची देखील एक्स मॅनेजर राहिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिशा फियॉन्सेसोबत मालाडमधील कल्याणनगर मधील अपार्टमेंटमध्ये राहते. याच बिल्डींगच्या 14व्या मजल्यावरून तिने उडी मारली आहे. बोरविलीमधील डॉक्टरांनी निशाला मृत घोषित केलं. दिशाच्या आई-वडिल आणि बॉयफ्रेंडचा याकामी जबाब घेण्यात आला आहे. तपास सुरु आहे.