By  
on  

Exclusive: दिशा सलियन केसमध्ये बॉयफ्रेंडने बदलला जबाब, पाहुण्यांचीही होणार चौकशी

सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सलियनने 14व्या मजल्यावरून उडी मारुन  आत्महत्या केली आहे. बंटी सजदेहच्या कॉर्नरस्टोनसाठी काम करणारी दिशा वरुण शर्मा आणि भारती सिंहची देखील एक्स मॅनेजर राहिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिशा फियॉन्सेसोबत मालाडमधील कल्याणनगर मधील अपार्टमेंटमध्ये राहते. याच बिल्डींगच्या 14व्या मजल्यावरून तिने उडी मारली आहे.

दिशा अलीकडेच बॉयफ्रेंड रोहन रायच्या घरी शिफ़्ट झाली होती. या दोघांचं लग्नही ठरलं होतं. पण रोहन तिला फसवत असल्याची शंका होती. त्यातूनच त्या दोघांचा सतत वादही होत असे. त्यामुळे दिशाने या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा कयास आहे. 
आत्महत्येच्या रात्री या दोघांनी एक पार्टी ठेवली होती. त्यात जवळचे मित्र आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटीही होते. पार्टीमध्ये दिशा आणि रोहनचं भांडण झालं. त्यानंतर छ्तावरून आवाज आला. दिशा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पीपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लुसिव्ह माहिती नुसार रोहन त्याचा जबाब सतत बदलत आहे. सध्या दिशाच्या मृत्यूची नोंद आकस्मिक म्हणून केली आहे. पोलिस पोस्टमॉर्ट्म अहवालाची वाट पाहात आहेत. दिशाची कोविड-19ची टेस्टही केली जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive