करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला.
आता बॉलिवूडची हॉट बाला म्हणून ओळखली जाणारी आयटम गर्ल मलायका अरोराच्या फॅन्ससाठी एक आनंदाची वार्ता आहे. नाही नाही...अजूनतरी अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या कुठल्याही बातमीचा तिच्याकडून दुजोरा मिळालेला नाहीय...तर पिंपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार 27 जून, 2020 नंतर मलायका अरोरा 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या टीमसोबत शूटींगचा श्रीगणेशा करणार आहे. करोना संकटाच्या महामारीदरम्यान व अनलॉक १ मध्ये असं शूटींग करणारी मलायका पहिली सेलिब्रिटी ठरणार आहे.
तसंच पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम या शोची टीम ही मलायकाला शूटींगबाबत विचारणा करण्यासाठी थोडी कचरत होती. पण त्यांनी मलायकासमोर हा प्रस्ताव ठेवला आणि तिची प्रतिक्रीया पाहून ते आश्चर्यचकितच झाले. तिने तात्काळ टीमला होकार कळवला. तीसुध्दा पुन्हा सेटवर येण्यास प्रचंड उत्सुक होती.
दरम्यान या शोचं शूटींग सोशल डिस्टन्सिंग व योग्य त्या सर्व सरकारच्या सूचनांचं पालन करुनच केलं जाणार आहे. तसंच आणखी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळाली म्हणजे अनेक टी.व्ही शोच्या निर्मात्यांनी अभिनेत्यांच्या मानधनात कपात केल्यायचं बोललं जात होतं, पण मलायकाने हे वृत्त फेटाळून लावत आहे त्याच मानधनावर काम करण्यास संमती दिल्याचं कळतं.