By  
on  

Exclusive: अमृता अरोराचे सासू-सासरे आणि स्टाफ तसेच सोफी चौधरीची हाऊसमेडदेखील Covid-19 पॉझिटिव्ह, बिल्डींग झाली सील

खार वेस्ट येथील टस्कनी अपार्टमेंटला मलाईका अरोराचं घर म्हणून ओळखलं जातं. पण ही पॉश बिल्डींग शासनाच्या नजरेसमोर आहे. कारण या अपार्टमेंटमधील 2 सेलिब्रिटींच्या घरी करोना पोहोचला आहे.अभिनेत्री सोफी चौधरीच्या घरी काम करत असलेल्या कामवालीला करोनाची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. सोफीच्या कामवालीला करोना होण्याचं कारण एक नर्स आहे. ही नर्स अमृता अरोराच्या सास-यांच्या उपचारासाठी आली होती.

पीपिंगमूनला मिळालेल्या महितीनुसार अमृताचे सासू-सासरेही करोना पॉझिटिव्ह आहेत. अमृतानेच हा खुलासा केला आहे. ‘ पण ते आता ठिक आहेत आणि होम क्वारंटाईन आहेत.’ असंही तिने सांगितलं. अमृता सासू सास-यांच्याच्या घरी काम करत असलेला स्टाफही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर येत आहे. करोनाच्या या केसेसमुळे टस्कनी अपार्टमेंटमधील रहिवासी चिंतेत आहेत. हे अपार्टमेंट आता सील केलं गेलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive