By  
on  

Exclusive : संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठीयावाडी'मध्ये इम्रान हाश्मी झळकतोय या भूमिकेत

संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठीयावाडी हा सिनेमा चित्रिकरणापूर्वी बराच चर्चेत आहे. त्यात अभिनेत्री आलिया भट ही गंगूबाईची भूमिका साकारत असल्याने याविषयी उत्सुकता आणखी ताणली गेलीय. त्यात ब-याच दिवसांपासून अभिनेता इम्रान हास्श्मी या सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबईच्या कामाठीपुरातील कोठा चालवणा-या स्त्रीच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. 

पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठीयावाडी सिनेमात इम्रानच झळकतोय. आलिया भट साकारत असलेल्या गंगूबाईच्या व्यक्तिरेखेच्या पतीच्या भूमिकेत तो झळकणार आहे. गंगूबाईचा पतीच तिला खुप लहान वयातच या वेश्या व्यवसायात ढकलतो. एकूणच खलनायकी भूमिकेत आपल्याला इम्रान या सिनेमात दिसेल. या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive