बिग बॉस हा छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो. यंदा त्याचा १४ वा सीझन असणार आहे. परंतु करोना लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमाला ग्रहण लागलं. प्रेक्षकांना आपण यंदा या कार्यक्रमाला मुकतो की काय असंच वाटू लागलं असतानाच पिपींगमूनच्या हाती एक्सक्ल्युझिव्ह वृत्त आहे. ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये हा शो चित्रित होत आहे.
भांडणं, रुसवे-फुगवे, प्रसंगी हाणामारी, आरोप-प्रत्यारोप तर कधी प्रेमाचो उमाळे पाहायला मिळणा-या बिग बॉस या रिएलिटी शोला प्रेक्षकांची पसंती मिळते. BB14 या शोला सध्यातरी पुढे ढकलण्यात आल्याचं समजतंय. तसंच शोचे निर्माते सोशल डिस्टन्सिंगचा व इतर नियमांचं पालन करत हा कार्यक्रम कसा चित्रित करायचा यावर प्लॅनिंग करतायत.
बिग बॉसच्या शूटींगसाठी ३०० पेक्षा अधिक क्रू मेंबर्सची गरज भासते. तंत्रज्ञ, कलाकार, स्टोरी एडिटर्स, एडिट टीम मेंबर्स, पीसीआर- (प्रोडक्शन कंट्रोल रुम) या सर्वांचा यात सहभाग असतो. पण आता या आव्हानात्मक परिस्थितीशी तोंड देत काम करण्यास निर्माते तयार आहेत. कॉन्सेप्टवर काम सुरु आहे,अशातच PeepingMoon.com ला मिळालेल्या खास एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार कोविड-१९ ही यंदाची थीम असू शकते, यावर तुम्हीही विचार नक्कीच कराल.
बिग बींना सलमान करणार फॉलो
सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर कोणीही पडू शकत नसल्याने घरातूनच शक्य तितकं काम केलं जात आहे. ज्याप्रमाणे बिग बींनी घरातूनच केबीसी शोच्या आगामी सीझनचा प्रोमो केला त्याप्रमाणेच सलमानसुध्दा पनवेलच्या फार्म हाऊसवरुन चित्रित करु शकतो. सद्या त्याच्या प्रोमो कॉन्सेप्टवर काम सुरु आहे. पण एकूणच त्यालासुध्दा कोविड-१९ पार्श्वभूमी असणार हे नक्की.