अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करत संपूर्ण कलाविश्वच नाही तर देशभर सर्वांना चटका लावून सुशांत सिंग राजपूत गेला. पण त्याच्या आत्महत्येचं गूढ अद्याप तसंच आहे. त्याच्या आत्महत्येला अवघे काही तासच उलटले असताना आता अनेक माहिती समोर येऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, तो जो वांद्रे येथील पाली हिलच्या मॉन्ट ब्लाक इमारतीत राहायचा तेथील वॉचमन व लिफ्टमॅनकडूनच काही गोष्टी समजल्या आहेत.
सुशांतने आपला संपूर्ण लॉकडाऊनकाळ हा याच वांद्रयातील पाली हिलच्या इमातीत घालवला. गेल्या महिन्याभरापासून आवश्यक गोष्टी वगळता तो कधीच जास्त बाहेर गेला नाही. पण इमारतीच्या वॉचमन व लिप्टमॅनकडून समजलं की,सुशांत खुपच लाघवी व बोलका होता. तो स्वताहून नेहमी सर्वांची विचापूस करायचा.तसंच सर्वांना मदतसुध्दा करायचा. त्याच्या घरी काम करणा-या नोकरांना तो नेहमीच आर्थिक मदत करत असे. पण गेल्या महिन्याभरापासून तो कुठल्यातरी चिंतेने ग्रासला होता. त्याने बोलणंच सोडून दिलं होतं. नैराश्य त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होतं.