By  
on  

PeepingMoon Exclusive : एक्स मॅनेजर दिशाच्या आत्महत्येने अस्वस्थ होता सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानवच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहचला. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व आज शोकसागरात बुडालं. त्याचं जाणं चटका लावून तर गेलंच पण आत्महत्येचं गूढ अद्याप अस्पष्टच असताना त्याच्याबद्दलची नानाविविध माहिती आता समोर येतेय. 

पिपींगमूनला सुशांतसोबत त्याच्या वांद्रे येथील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये राहणा-या समीर या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे काही दिवसांपासून अस्वस्थ होता. दिशाने मागच्याच आठवड्यात मालाड येथे आपल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचा तपास अद्याप पोलिस करत असतानाच आज सुशांतने आत्महत्या केलीय. 

तसंच सुशांतच्या या मित्राने पुढे सांगितलं, दिशाच्या आत्महत्येनंतर सुशांतने गुगलवरुन तिच्या आत्महत्येबद्दलच्या सर्व बातम्या पिंजून काडल्या व मग ती किती उत्तम प्रकारे सर्व कामं हाताळायची या आठवणीत तो रममाण झाला. त्याचा २०१६ साली आलेला सुपरहीट एम एस धोनी सिनेमाची सर्व प्रसिध्दीची कामं तिने कशी लिलया पेलली हेही त्याने त्याला  सांगितलं. समीरच्या या स्टेटमेंट नंतर पोलिसांनी सुशांतचा फोनही जप्त केलाय. 

तसंच सुशांत आणि अभिनेत्री रिहा चक्रवर्ती यांच्या रिलेशनशीपबद्दल त्याने कधीच उघडपणे काही सांगितलं नाही. तसंच सोसल मिडीयावरही दोघांचे फारसे फोटो पाहायला मिळाले नाहीत. या दोघांचं नातं बिनसल्याची चर्चा सिनेवर्तुळात होती तसंच सुशांतचा हा मित्र समीर त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत असल्याचं रिहाला अजिबात आवडायचं नाही. तो दुसरीकडे शिफ्ट व्हावा असा तिचा तगादा असायचा, असंही ऐकायला मिळालं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive