मेकॅनिकल इंजिनीअर, बॅकग्राऊण्ड डान्सर, छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय नायक ते .....बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख प्रस्थापित करणा-या सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या करणं सर्वांनाच चटका लावून गेलं... वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी असंख्य प्रश्न तो मागे सोडून गेला. काल त्याच्या निधनाचं वृत्त टी.व्हीवर पाहून त्याच्या वडीलांना भोवळच आली. अद्यापही ते या धक्क्यातून सावरु शकले नाहीत.
आज त्याच्या अंत्यंसंस्कारासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब हे पटनाहून मुंबईत दाखल झालं आहे. आज सायंकाली ५ वाजता विले पार्ले येथील पवनहंस स्माशानभूमीत सुशांतचा अंत्यविधी पार पडेल. सध्याचा लॉकडाऊन काळ व करोनाच्या परिस्थितीमुळे सुशांतच्या कुटुंबातील फक्त ८ जणांनाच यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सुशांतचं पोस्ट-मार्टेम आज सकाळी ८ वाजता कूपर रुग्णालयात पूर्ण झालं. तीन डॉक्टरांच्या टीमने हे पोस्ट-मार्टेम पूर्ण केलं असून त्याचं चित्रणही करण्यात आलं आहे.
प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचंच निष्पन्न झालं आहे.