By  
on  

Exclusive: ‘खतरोंके खिलाडी 10' साठी रोहीत शेट्टी करणार मुंबईमध्ये शुटिंग

कलर्सने धडाक्यात 'खतरोंके खिलाडी 10' ची सुरुवात केली होती. या सीझनला उत्तम प्रसिद्धीही मिळत होती. पण फिनाले जवळ असतानाच लॉकडाऊनमुळे शुटिंग थांबवावं लागलं. पण आता अशी बातमी येत आहे की या शुटिंगला पुन्हा सुरुवात होणार आहे. आता पीपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह बातमी नुसार हा फिनाले बॅंकॉक मध्ये शुट केले जाणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. 

यानंतर  हैदराबाद के रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट पुर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला. पण क्रुची संख्या जास्त असल्याने परवानगी मिळू शकली नाही. आता पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार हे शुटिंग महाराष्ट्रात होणार आहे. टीम जुलैच्या पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या लोकेशनवर शुट करेल. यावेळी सर्व सहभागी कलाकार उपस्थित असतील. अक्षय कुमार, कतरिना अजय देवगण आणि रणवीर सिंग स्टारर 'सुर्यवंशी' रिलीजपुर्वी या फिनालेला प्रमोट करताना दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive