हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अशी आत्महत्या करुन जीवन संपवण्याने कलाविश्वच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. मुंबई पोलिस हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणातील तपासणीत सगळे धागेदोरे तपासून पाहत आहेत. सर्वांची कसून चौकशी केली जात आाहे. नैराश्येतून सुशांतने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे, पण त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान नुकतीच एक माहिती मिडीया रिपोर्टसमधून समोर आली आहे, ती म्हणजे त्याच्या वडीलांना के.के सिंग यांना तो नैराश्येनेग्रस्त असल्याबाबत व कुठला मानसिक उपचार घेत असल्याबाबत काहीच माहिती नव्हतं असं पोलिसांना सांगितलं. तसंच त्यांनी पुढे हेही नमूद केलं पण काही दिवसांपासून तो थोडा हताश वाटत होता. सुशांतचे वडील के.के सिंग हे सोमवारी त्याच्या अंत्यविधीसाठी पटनाहून मुंबईत आले.
सुशांतच्या बाबांनी पोलिसांना सांगितलं,त्याच्या नैराश्येबाबत कल्पना नली तरी त्याच्या हातून मोठमोठे महत्वाकांक्षी प्रोजेक्टस निघून गेल्याचं त्याने मला आणि त्याच्या बहिणींना सांगितलं होतं. तसंच मागच्या काही महिन्यांत फक्त २-३ वेळाच त्याने फिल्म इंडस्ट्रीतल्या टेन्शनबाबत उल्लेख केला होता.