वेब सिरीज मिर्झापुरच्या नव्या सीझनची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. या वेबसिरीज मध्ये आता अभिनेता विजय वर्माची एंट्री झाली आहे. विजय वर्मांनी यापुर्वी गलीबॉय मध्येही काम केलं होतं. ते या वेबसिरीजमध्ये डबल रोल करताना दिसून येतील. मिर्जापुरच्या दुस-या सीझनमध्येही पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा आणि अली फज़ल यांच्या भूमिका दिसून येणार आहेत. रासिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, राजेश तैलंग हे देखील असणार आहेत.
मिर्जापुरच्या पहिल्या सीझनने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. समीक्षकांनीही या वेबसिरीजला नावाजलं होतं. त्यामुळे आगामी सीझनबाबत चाहत्यांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे यात शंका नाही. उत्तर प्रदेश आणि पुर्वांचलच्या पार्श्वभूमीवर या वेबसिरीजची कथा बेतली आहे. या वर्षाखेरीस किंवा २०२०च्या सुरुवातीला ही सिरीज रसिकांच्या भेटीला येऊ शकते.