Peepingmoon Exclusive: विपुल शहांच्या आगामी सिनेमात विद्युत जामवाल झळकणार?

By  
on  

फिल्ममेकर विपुल अमृतलाल शहा काही वर्षांपुर्वी नमस्ते इंग्लंड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एका मोठ्या ब्रेकनंतर यावर्षाखेरीस ते पुन्हा एकदा नव्या सिनेमाच्या तयारीत आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार विपुल यांचा आगामी सिनेमा सत्य घटनेवर बेतला असणार आहे. तर या सिनेमात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. विपुल यांची निर्मिती असलेल्या चार सिनेमात विद्युत यापुर्वीच चमकला आहे. 

त्यामुळे या सिनेमासाठीही त्याने होकार दिल्याचं समजत आहे. विपुल यांनी अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘नमस्ते लंडन, आंखे आणि वक्त या सिनेमांची निर्मिती केली होती. विद्युतला त्यांनी जॉन अब्राहमच्या ‘फोर्स’मध्ये व्हिलन साकारताना पाहिलं होतं. विपुलला त्याच्यासोबत काम करायचं होतं. पण एका उत्तम कथेच्या शोधात ते होते. 

 

विपुल शहा यांनी गुजराती लेखक हरिकिशन मेहता यांच्या 21 कादंब-यांचे हक्क 2018 मध्ये विकत घेतले आहेत. त्यापैकी 4 कादंब-यांच्या पटकथा लेखनाचं काम सुरु आहे. विपुल आणि विद्युतच्या नव्या सिनेमाबाबत माहिती समजली नसली तरी हा सिनेमा त्यावर बेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

विद्युत जामवाल त्याच्या आगामी ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. असं समोर येत आहे की त्याचा फारुक कबीर दिग्दर्शित आगामी सिनेमा खुदा हाफिज ‘डिस्ने हॉटस्टार’ वर दाखवली जाणार आहे. याशिवाय तो महेश मांजरेकरांच्या या वर्षाखेरीस समोर येत असलेल्या अ‍ॅक्शन सिनेमामधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Recommended

Loading...
Share