अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’मध्ये संजना सांघी त्याची कोस्टार दाखवली आहे. हा सिनेमा डिझ्ने प्लस हॉटस्टारवर म्हणजेच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याच संजना सांघीला बांद्रा पोलीसांनी आज बोलावून घेतलं आहे जे सध्या सुशांतच्या आत्महत्येच्या केसविषयी तपास करत आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार पोलीस संजना सांघीला ‘दिल बेचारा’ सेटवरील सुशांतविरोधातील #MeToo आरोपांविषयी विचारण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे त्रासात येऊन तो नैराश्येमध्ये गेला का? हा तपासही यात होईल.
2018मध्ये #MeToo चळवळ सुरु होती, तेव्हा हा सिनेमा डेब्यू दिग्दर्शक मुकेश छाबरामुळे वादाच्या भोवऱ्यात होता. लैगिक अत्याचाराच्या आरोपामुळे तो या सिनेमातून बाहेर पडला होता. त्यावेळी ‘दिल बेचारा’ हा सिनेमा ‘किझी और मेनी’ या नावाच्या अंतर्गत चित्रीत होत होता. मात्र कोणताही पुरावा न मिळाल्याने छाबराला क्लिन चिट मिळाली आणि त्याने पुन्हा हा सिनेमा चित्रीत करायला सुरुवात केली. त्यानंतर या #MeToo मध्ये सुशांतचं नाव आलं होतं, जे त्याची कोस्टार संजनाने समोर आणलं असं बोललं गेलं. आणि अशा बातम्यांनी सुशांतवर परिणाम झाला. सुशांतने नंतर संजनाशी संपर्क साधला आणि या आरोपांना सामोरं गेला. मात्र त्यानंतर काहीच समोर आलं नाही आणि सुशांतला हे सगळं सहन करावं लागलं. सुशांतने त्यावेळी ट्विट केलं होतं की, “शेवटची गोष्ट जी अजेंडासाठी केलेल्या कथित गोष्टीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी योग्य वाटतय.”
तर संजना जी तेव्हा देशाबाहेर होती ती जेव्हा परतली तेव्हा तिने मौन सोडलं आणि स्पष्टीकरण दिलं. आणि सुशांतविषयीचे आरोप निराधार असल्याचं ती बोलली होती. ती म्हटली होती की, “मला स्पष्ट करायचं आहे की अशी कोणतीच घटना घडलेली नाही. याचा आता शेवट करूयात.” पण यामुळे नुकसान आधीच झालं होतं, आणि त्यांनी ‘दिल बेचारा’चं चित्रीकरण ठरलेल्या वेळेच्या आधीच आटोपलं. आणि आता पोलीस याविषयी जास्तीत जास्त तपास करत आहेत ज्याने सुशांतने आत्महत्या का केली याचा तपास लागेल. आणि आता #MeToo चा वादही ते तपासून पाहत असल्याचं दिसतय. आजच्या स्टेटमेंटमध्ये संजना याविषयी काय सांगते हे महत्त्वाचं ठरेल.
कालच डिझ्ने प्लस हॉटस्टारच्या लाईव्ह कार्यक्रमात ‘दिल बेचारा’ हा सिनेमादेखील बॉलिवुडच्या इतर काही बिग बजेट सिनेमांप्रमाणे ओटीटीवर येत असल्याचं सांगीतलं गेलं. शिवाय काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा ओटीटीवर येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती.