सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी वांद्रे पोलिसांनी ६ जुलै रोजी केली. संजय लीला भन्साळी यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांसंदर्भात केली गेली. फक्त तीन तासच ही चौकशी सुरु होती. याप्रकरणात ज्याप्रमाणे आधी अनेकांची जशी कसून चौकशी करण्यात आली तशी भन्साळींची चौकशी झाली नाही.
पिपींगमूनला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळी यांना जवळपास एकूण ३५ प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमधला महत्त्वाचा प्रश्न होता की, 'गोलियों की रासलीला- रामलीला आणि 'बाजीराव मस्तानी' या सिनेमांतून भन्साळींनी सुशांतला का काढलं. ..जेणेकरुन तो नैराश्येत गेला. त्यावर भन्साली उत्तरले, मी कधीच सुशांतला कुठल्याच सिनेमातून वगळलं नाही किंवा त्याच्याबदली दुस-याला घेतलं नाही. मी पहिल्यांदा सुशांतला माझा टीव्ही शो सरस्वतीचंद्रच्या कास्टिंगदम्यान भेटलो होतो. त्या शोसाठी सुशांतची निवड झाली नाही, पण मी त्याच्या परफॉर्मन्सवर खुप खुश होतो.
तसंच संजय लीला भन्साळी यांनी पुढे हेसुध्दा कबूल केलं की, 2013 ते 2015 दरम्यान मी सुशांतला 'गोलियों की रासलीला- रामलीला आणि 'बाजीराव मस्तानी' या दोन सिनेमांची ऑफर दिली होती, पण त्या दरम्यान तो यशराजच्या पाणी प्रोजेक्टवर काम करत होता, मला माझ्या सिनेमांसाठी सुशांतचं पूर्ण डेडिकेशन हवं होतं. परंतु बिझी शेड्यूलमुळे सुशांतनेच माझ्या सिनेमांना नकार कळवला, त्यानंतर मी कधीच कुठल्या सिनेमांसाठी सुशांतला अप्रोच केलं नाही.तसंच इतर कलाकारांप्रमाणेच मी सुशांतलाही ओळखत होतो, पण त्याच्याशी माझ्याशी इतकी जवळीक नव्हती की त्याच्या नैराश्येबद्दल मला माहिती असेल.
सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या करणं सर्वांच्याच जिव्हारी लागलंय. अजूनही त्याचे मित्र, कुटुंबिय या धक्क्यातून सावरले नाहीत.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस सर्वच धागेदोरे तपासून पाहत आहेत. लवकरच यातून काहीतरी ठोस निष्पन्न होईल अशी चाहत्यांना आशा आहे.