Exclusive: ऐश्वर्या आणि आराध्या अजून जलसामध्येच, हॉस्पिटलाईज करणार नाही

By  
on  

अमिताभ, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्याचे करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पण या दोघींना अजूनही घरीच आयसोलेट केलं आहे. या दोघींना नानावटीमध्ये हॉस्पिटलाईज करायच नाही या निर्णयावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. ऐश्वर्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. तर आराध्याला सौम्य प्रमाणात संसर्ग आहे. अशावेळी या दोघींना अ‍ॅडमिट करण्याबाबत कोणताही संकेत मिळाले नसल्याचं नानावटी हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.

 

BMC ची टीम बच्चन यांच्या घरी पोहोचली असून या दोघींना कोणतंही लक्षण नसल्याने घरीच आयसोलेट केलं जाणार आहे. या दोघींची पुन्हा पाच दिवसांनी टेस्ट केली जाईल. नऊ वर्षांच्या आराध्याला घरीच ठेवणं योग्य आहे की हॉस्पिटलमध्ये यावर बच्चन कुटुंबिय त्यांच्या फॅमिली डॉक्टरांचंही सेकंड ओपिनियन घेताना दिसत आहे. यादरम्यान अभिषेकला सौम्य लक्षण आहेत पण श्वासोच्छ्वास करण्यास कोणतीही अडचण नसल्याचं समोर येत आहे. तर अमिताभ यांचीही प्रकृती स्थिर आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share