By  
on  

PeepingMoon Exclusive: वीजा इंटरव्यूज झाले पूर्ण, अक्षय कुमार आणि टीम 'बेल बॉटम' लवकरच यूकेसाठी निघणार

ऑनलाईन वीजा इंटरव्यूज आता संपले आहेत आणि बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमारची बॅग पॅक झाली आहे. आता रंजीत एम तिवारीची फिल्म 'बेल बॉटम'चं चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. आता फक्त वाट पाहायची आहे ती लंडनला पोहोचण्याआधी सगळ्या महत्त्वाच्या यूके एंट्रीच्या परमिट येण्याची.
1980 च्या दशकावर आधारित या गुप्तहेरी थ्रिलर फिल्मची इतर कास्ट आणि तीन लीडिंग लेडिज वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ता आता या एक्टरसोबत जाण्यासाठी तयार आहेत. मागील आठवड्यात सोशल मिडीयावर अक्षयने म्हटलं होतं की, "आम्ही कसं बेस्ट देऊ हे पुढे पाहतोय, आता कामावार परतण्याची वेळ आली आहे, #Bellbottom येत्या महीन्यात फ्लोरवर जाण्यासाठी तयार आहे.”

 
 सीम अरोडा आणि परवेज शेख यांनी लिहीलेल्या या फिल्मला घेऊन सुत्रांनी पीपिंगमूनला माहिती दिली की, “युनिटने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याला टार्गेट केले आहे. बेल बॉटम लॉकडाउन नंतर शुटिंग सुरु होणारी पहिली बॉलिवुड सिनेमांपैकी एक असेल. हे 45 दिवसांचं सिंगल शेड्युल असेल. जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असेल आणि फक्त अक्षयच हे करू शकेल.”
लॉकडाउनच्या काळात या सिनेमाच्या स्क्रिप्टचं काम पूर्ण झालं होतं. आणि आता 2 एप्रिल 2021मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल. या सिनेमाला पूजा एन्टरटेन्मेंट एम्मा एन्टरेटेन्मेंटसोबत मिळून प्रस्तुत करत आहेत. ज्याला वाशु भगनानी, जैकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निकिल आडवाणी यांच्या द्वारे निर्मिती केली आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive