By  
on  

Exclusive: पुढच्या शुक्रवारी होणार ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चा ट्रेलर रिलीज

करण जोहरच्या ‘कलंक’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता करण ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा ट्रेलर रिलीज करण्याच्या विचारात आहे. कलंक पाठोपाठ हा ट्रेलर रिलीज केल्याने लाईक्सचा वर्षाव होईल यात शंका नाही. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा ट्रेलर १२ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करत आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत. त्यामुळेच या सिनेमात करण आपल्या नवीन स्टुडंट्सकडून काय काय करवून घेणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. करण काही दिवसांपुर्वी सिंगापुरला गेला होता. त्याच्या सिंगापुरमधील मादाम तुसाँ म्युझियममधील वॅक्स स्टॅच्युचं उद्घाटन करणने नुकतंच केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive