Exclusive: Covid-19 ची भिती बाजूला सारून अक्षय कुमारने केलं 9 दिवसात 6 अ‍ॅडचं शुटिंग

By  
on  

अक्षय कुमार बॉलिवूडमधील जिगरबाज अभिनेता आहे. गेले चार महिने करोनामुळे वर्क फ्रॉम होम केल्यानंतर त्याने पुन्हा धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. पीपिंगमूननेच चाहत्यांसमोर आणलं होतं की अक्षयने अलिकडेच कुरकुरे या ब्रॅंडसाठी अ‍ॅड शुट केली होती. त्यानंतर जवळपास 6 अ‍ॅड्स त्याने त्याच ठिकाणी म्हणजे मेहबून स्टुडियोमध्ये शुट केल्या.

 

पीपिंगमूनच्या सुत्राने स्टुडियोला भेट दिली असता तो निरमा वॉशिंग पावडरची अ‍ॅड शूट करत होता. याशिवाय अक्षयने शुटसाठी त्याची व्हॅनिटीही तयार ठेवली होती. पण या दरम्यान मेहबूबमध्ये शुटिंग सुरु झाल्याने हे शूट तिथे करण्यात आलं. यावेळी या अ‍ॅडचे निर्माते सौरभ काब्रा यांनी सांगितलं की अक्षयच्या या निर्णयाने सिनेसृष्टीला काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

अक्षयने शुट सुरु केल्याने अनेक रोजंदारीवर काम करणा-या कामगारांना आर्थिक पाठबळ मिळालं आहे. यासोबतच कामगारांच्या युनिटनेही अक्षयच्या या निर्णयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. परराज्यातील हे कामगार काम सुरु झाल्याने खुश आहेत. पौष्टिक जेवण, सॅनिटायझर, पीपीई किट, मास्क या सगळ्याची सुविधाही स्टुडियोवर केली होती .

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share