Exclusive: पटना पोलिसांना हवाय सुशांतचा शवविच्छेदन रिपोर्ट

By  
on  

 मुंबई पोलिसांसोबतच पटना पोलिस सुशांत राजपुतच्या आत्महत्या स्वतंत्र आणि समांतर तपास करत आहे. या संबधी कागदपत्रंही गोळा करण्याचं मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली समजलं आहे की, पटना पोलिस मुंबई पोलिसांच्या कारभारावर नाराज आहे. यासोबतच त्यांना सुशांतच्या आत्महत्येचा सीन पुन्हा एकदा रिक्रिएट करायचा आहे. 
बांद्रा येथील सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये हा सीन रिक्रिएट केला जाणार आहे. यासोबतच सुशांतचा पोस्टमॉर्ट्म रिपोर्टही त्यांना पाहिजे आहे. यासोबतच त्यांना कुपर हॉस्पिटलमध्ये बनवला गेलेला त्याचा पोस्ट्मॉर्टम व्हिडियोही तपासासाठी हवा आहे. याशिवाय घटनास्थळी काढलेले फोटोही पटना पोलिसांना हवे आहेत. 
पण मुंबई पोलिसांनी मात्र अजून कोणतेही डॉक्युमेंट पटना पोलिसांना दिले नाहीत. पटना पोलिस सुशांतच्याच वयाचा आणि उंचीचा एक डमी आणून आत्महत्येचा सीन रिक्रिएटही करणार आहेत.

Recommended

Loading...
Share