By  
on  

Peeping Moon Exclusive : जाहिरातीच्या शूटींगसाठी अनुष्का शर्मा बनली पती विराट कोहलीची कॅमेरापर्सन

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वात जास्त चर्चेत असणा-या सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघंही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असतात. लॉकडाऊनमधली त्यांची एकमेकांसोबतची धम्मालसुध्दा चाहत्यांना त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटमुळे अनुभवायला मिळाली. आता पिपींगमूनच्या हाती आलेल्या एका एक्सक्लुझिव्ह वृत्ताुसार, हे दोघंही पती-पत्नी एकमेकांना खंबीर साथ देण्याची एकही संधी सोडत नाहीत. याची प्रचिती नुकतीच आली. 

पुढच्याच महिन्यात आयपीएल 2020 क्रिकेटमॅचेस सुरु होत आहेत. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्सचा तगडा खेळाडू विराट कोहली शुक्रवारी दुबईला रवाना होण्यापूर्वी एका जाहिरातीचं शूटींग त्याने केलं. तुम्ही म्हणाल ह्यात काय नवल. क्रिकेटर्सना तर अनेक जाहिरातींसाठी शूटींग करणं ही नित्याचीच बाब आहे. पण विराटचं हे शूट खास होतं कारण, त्याच्या या जाहीरातीचं शूटींग खुद्द  त्याची अभिनेत्री-निर्माती पत्नी अनुष्का शर्माने केलं. बॅंगलोर येथील एका ई-कॉमर्स कंपनीची ही जाहिरात शूट करायची होती. 

वरळी येथील ओंकार अपार्टमेंटच्या 7,171 स्के्वअर फुटच्या शानदार फ्लॅटमध्ये विराट-अनुष्का राहतात. तेथेच अनुष्का विराटच्या या जाहिरातीच्या शूटींगसाठी त्याची कॅमरापर्सन बनली.

PeepingMoon.com ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिध्द फोटोग्राफर आणि डिरेक्टर  Colston Julian यांनी अनुष्काला या शूटींगसाठी मार्गदर्शन केलं, की कशाप्रकारे जाहिरातीसाठी फोनवर फोटो कॅप्चर करायचे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive