Peepingmoon Exclusive: बिग बॉस 14च्या प्रोमो शुटसाठी सलमान पोहोचला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये

By  
on  

नुकतंच बिग बॉस 14 चे पडघम वाजले आहेत. 3 ऑक्टोबरला या शोचा ग्रॅण्ड प्रिमिअर होणार आहे. आता सलमान या शोच्या दुस-या प्रोमो शूटसाठी तयार झाला आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या बातमीनुसार सलमान दुस-या प्रोमो शूटसाठी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये पोहोचला आहे.जुहूमधील J.W.Marriot मध्ये या सगळा सेटअप उभा केला गेला आहे. व्हर्च्युअल इंटरॅक्शनवर हा प्रोमो बेतला असेल. कमीत कमी क्रु मेंबर्ससोबत शुटिंग केलं जाणार आहे. शासनाच्या सुचनांचं पालन करत प्रॉडक्शन टीमध्ये केवळ 30 मेंबर्सचं असणार आहेत. 

सर्व मेंबर्सच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. सलमानने ऑगस्ट मिडमध्ये पहिल्या प्रोमोचं शूट केलं होतं. संपुर्ण लॉकडाऊन पनवेलमधील फार्महाऊसमध्ये घालवल्यानंतर सलमान शुटसाठी मुंबईला आला होता. बिग बॉसचा 14 वा सीझन 3 ऑक्टोबर पासून रात्री 9 वाजता सुरु होत आहे.

Recommended

Loading...
Share