'शुभमंगल ऑनलाइन' मध्ये मिळणार एक ऑफलाईन धक्का

By  
on  

शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगलीय. शंतनू आणि शर्वरीची ही ऑनलाईन केमिस्ट्री येत्या 28 सप्टेंबरपासून रसिकांच्या भेटीला येतेय. शुभमंगल ऑनलाईन मालिकेद्वारे सुयश टिळक आणि सायली संजीव यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सायली आणि सुयश  पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार असल्याने उत्सुकता तर आहेच. पण आता म्हत्त्वाचं म्हणजे मालिकेचे निर्माते अभिनेते सुबोध भावे यांचीसुध्दा यात एक खास भूमिका असल्याचं कळतंय. 

 

 

सुबोध भावे यांनीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत एक "शुभमंगल ऑनलाइन मध्ये.....एक ऑफलाईन धक्का" असं म्आहटलं आहे. त्यामुळे ते या मालिकेत एका खास भूमिकेत असणार हे कन्फर्म आहे. पण त्यांच्या भूमिकेविषयी अद्याप कुठलाच उलगडा झालेला नाही. त्यामुळे ही मालिकेबाबतची नवी उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. 

 

 

या मालिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणतात, "‘माणूस एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळी माध्यमं शोधून काढतो, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. प्रेम करणाऱ्या शर्वरी आणि शंतनू यांनीही असंच प्रेमाचं वेगळं माध्यम शोधून काढलं आहे, त्याचीच ही गोष्ट !  मालिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक दिवस मालिकेची निर्मिती करावी अशी ईच्छा होती पण हवी तशी स्क्रिप्ट मिळत नव्हती... लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गोष्ट आली, जी आम्हां सगळ्यांना आवडली आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येतेय."

Recommended

Loading...
Share