By  
on  

पाहा Video : 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर होणार लोकसंगीताचा गजर!

'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम सध्या सेलिब्रिटींच्या उत्तमोत्तम गाण्यांची परफॉर्मन्सनी रंगत जातोय. एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करत हे सेलिब्रिटी परिक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकतायत. 

'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात या आठवड्यात लोकसंगीत विशेष भाग होणार  आहे. स्पर्धक  लोकगीतं सादर  करणार आहेत. पोवाडा, अभंग, लावणी, भारूड असे लोकसंगीताचे विविध प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. 

 

 

अंशुमन 'विंचू चावला' हे भारूड सादर करणार आहे. अर्चना लावणी सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल तर यशोमान आपल्या अभंगातून सर्वांना नरसोबाच्या वाडीचं दर्शन घडवेल. संकर्षणच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या पोवाड्यानी तर मैफलीचा रंगच बदलून टाकला आहे आणि गिरिजाच्या गवळणीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

 

'सिंगिंग स्टार' लोकसंगीत विशेष भाग नक्की पाहा, ९ आणि १० ऑक्टोबर, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive