By  
on  

निखिल चव्हाण बनला आहे रुबाबदार कारभारी, पाहा नवा प्रोमो

लॉकडाऊननंतर अनेक वाहिन्यांनी नवीन मालिकेची घोषणा केली. यामध्ये झी मराठी च्या ‘कारभारी लयभारी’ मालिकेचा समावेश आहे. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये एक युवा नेता जोशपुर्ण भाषण करताना दिसतो. 
आता या युवा नेत्याचा चेहरा समोर आला आहे. निखिल चव्हाण ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर निखिलसोबत या मालिकेत अनुष्का सरकटे दिसणार आहे. 

 

 

दुस-या प्रोमोमध्ये दिल्लीतील महत्त्वाची बैठक सोडून हा युवा नेता गावी असलेल्या त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी प्रसंगी अनेक अडचणी पार करून कसा येतो ते दिसत आहे.  या मालिकेचं दिग्दर्शन इंद्रजीत भोसले यांनी केलं आहे. मालिकेत रंगणारं राजकारण आणि त्यातून फुलत जाणारी प्रेम कहानी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का ते कळेल लवकरच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive