By  
on  

पम्मी घेणार आता सगळ्यांची विकेट, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

सध्या नव्या मालिकांची नांदी होताना दिसते आहे. लॉकडाऊनंतर वाहिन्यांनी रुपडं बदलत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आताही एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातली आहे. 

 

 

 ‘तुझं माझं जमतंय’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेत शेवंता फेम अपुर्वा नेमळेकरचा हटके लूक दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये नवी नवरी गृहप्रवेशाच्या वेळी उखाणा घेत असते त्याच दरम्यान होते पम्मीची एंट्री. आता पम्मी यांची लव्हस्टोरी यम्मी करणार का ते मात्र मालिका पाहिल्यावरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive