By  
on  

या दिवशी प्रसारित होणार ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेचा शेवटचा भाग

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेला प्रेक्षकांचा विशेष कौल मिळाला. या मालिकेतील कुटुंबाची केमिस्ट्री पडद्यावर उत्तमप्रकारे साजरी केलेली दिसून येत आहे. आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी हे कलाकार या मालिकेत भूमिका साकारत आहेत. तर केदार आगास्कर, सखी दातार, पूर्वी शाह या कलाकारांनी मालिका अधिक रंगतदार केली आहे. 

पण ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे. येत्या 22 ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. पण हा शेवटचा भाग असला तरी पहिला सीजन संपतो आहे. या मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम पाहता या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive