By  
on  

Video : लतिकाचं ठरलेलं लग्न वाचवण्यासाठी अभिमन्यू करू शकेल का पैशांची जुळवाजुळव?

थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकार' देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’.  अल्पावधितच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. ब-याच प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर अखेर आता लतिकाचं लग्न ठरलंय. घरातले सर्वचजण आनंदून गेले आहेत. मेहंदी, संगीत हे सर्व सोहळे साग्रसंगीत पार पडलेत आणि आता लग्नघटिका समिप आली आहे. 

 

 

नवराई लतिका नटून-थटून लग्नमंडपात सज्ज आहे, पण जोपर्यंत लतिकाच्या घरच्यांकडून पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत नवरदेव लग्नमंडपात पाऊल ठेवणार नाही अशी ताकिद लतिकाच्या घरच्यांना मिळालीय. लतिकाचं ठरलेलं लग्न वाचवण्यासाठी अभिमन्यू करू शकेल का पैशांची जुळवाजुळव? तो वेळेत पोहचेल का, हे जाणून घेण्यासाठी रविवारचा महाएपिसोड चुकवून तुम्हाला चालणार नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive