By  
on  

संकर्षणच्या पोवाड्याने भारावून जाणार 'सिंगिंग स्टार'ची मैफल

'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम सध्या सेलिब्रिटींच्या उत्तमोत्तम गाण्यांची परफॉर्मन्सनी रंगत जातोय. एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करत हे सेलिब्रिटी परिक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकतायत. 

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात लोकसंगीत विशेष भाग सादर होणार आहेत. या भागात सर्वांचं लक्ष बंधून घेत आहे संकर्षणने सादर केलेला पोवाडा. अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या वर्णनाचा हा पोवाडा ऐकताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो आणि संकर्षणने तो ज्या जोमाने सादर केला आहे ते ऐकून परीक्षक आणि स्पर्धक सगळेच भारवून गेले.

 


 

पाहा सिंगिंग स्टार, लोकसंगीत विशेष भाग 9-10 ऑक्टोबर रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive