असा सुरु आहे सई बिराजदारचा मेकअप रुममध्ये टाईपास, पोस्ट केले हे फोटो

By  
on  

'माझा होशील ना' मालिकेतली अल्लड -अवखळ पण तितकीच बिनधास्त सई बिराजदार अल्पावधीतच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. दोस्ताच्या जीवाला जीव देणारी सई सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेत सई आणि आदित्यमध्ये आता प्रेम हळूहळू फुलणार अशी चिन्हं आहेत. 

आदित्य आणि सईचं लग्न जुळणार का आणि कसं , केव्हा असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. याची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळतील.घरात एकही बाई नाही , फक्त चार मामा असलेल्या घरात सई गेल्यावर काय होईल याची कल्पना मात्र तुम्ही करुच शकता. सई साकारणारी गोड आणि सुंदर अभिेनत्री म्हणजेच गौतमी देशपांडे. तिलाही हाच प्रश्न पडला आहे. घरात फक्त मामा आहेत आणि मालिकेच्या सेटवरसुध्दा. म्हणूनच मेकअपरुमध्ये सेल्फी काढत सई फेम गौतमी टाईमपास करते. हेच फोटो तिने  नुकतेच पोस्ट केले आहेत. 

 

 

 

गौतमी देशपांडेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share