By  
on  

श्रीधर काळेच्या गोड स्वभावामागे लपलं आहे कोणतं रहस्य? पाहा नवा प्रोमो

अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री करतोय. ‘तुला पाहते रे’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता सुबोध भावे 'चंद्र आहे साक्षीला' या नव्या मालिकेत दिसणार आहे. यामध्ये सुबोधसोबत ऋतुजा बागवेही दिसते आहे. सुबोधच्या नव्या मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच समोर आला आहे. 

 

 

यामध्ये बायकोवर नितांत प्रेम करणारा श्रीधर दिसतो पण एकीकडे त्याच्यातील निरागस भाव जाऊन खलनायकी लूक दिसू लागतो. हा प्रोमोपाहून सुबोध पुन्हा एकदा ग्रे शेडमध्ये दिसणार की काय अशी शंका चाहत्यांना वाटल्याशिवाय राहणार नाही. ही मालिका 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive