By  
on  

Video: कारभारी लयभारी! शनायाच्या घरी गॅरी करी चाकरी

माझ्या नव-याची बायको ही धम्माल आणि कुरघोडी यांनी भरपूर असलेली मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतली गुरुनाथ, राधिका आणि शनाया या पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीसुध्दा आपली ओळख निर्माण केली आहे. 

सध्या मालिकेत एक भन्नाट ट्रॅक सुरु आहे. गुरनाथची पूर्व पत्नी राधिका आणि आत्ताची पत्नी शनाया या दोघी गुरुनाथ विरोधात एकत्र उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना त्याला चांगलाच धडा शिकवायचाय. राधिका मसालेची मालकीण राधिकाने तिचा सर्व कारभार शनायाच्या हाती सोपवून शनायाला सर्वेसर्वा केलं आहे. त्यामुळे गुरु राधिका आणि शनायाच्या ह्या प्लॅनला बळी पडलाय. राधिका मसाले आपल्या हातात घेण्यासाठी तो शनायाच्या मागे-पुढे करतोय. तिची सर्व कामं तो करतोय. एकूणच तिच्या घरी राबतोय. शनायासुध्दा ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेत त्याला वाट्टेल ते काम सांगतेय. अगदी कुठलीही कामं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शनायाच्या घरी गॅरी करी चाकरी. #MajhyaNavaryachiBayko #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

त्यामुळे राधिका आणि शनायाने गुरुला अद्दल घडविण्यासाठी व राधिका मसाले ब्रॅण्ड आणखी पुढे नेण्यासाठी ज्या हालचाली चालवल्या आहेत, त्यात आता काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive