By  
on  

Video : पश्याने दिलेलं गिफ्ट अंजी स्वीकारणार का...? पाहा 'सहकुटुंब सहपरिवार'

'सहकुटुंब सहपरिवार' ही रसिक प्रेक्षकांची लाडकी मालिका लवकरच एका नव्या वळणावर येऊन ठेपली  आहे. गेले कित्येक दिवस पश्याच्या मागे गिफ्टसाठी तगादा लावणारी अंजी आणि तिला गिफ्ट देण्यासाठी धडपडणारा पश्या आपण पाहिला. पण आता हाच पश्या एक जगावेगळं गिफ्ट अंजीला देणार आहे. 

पश्याच्या राहणीमानामुळे अंजीला तो आवडत नाही. तिला त्याची लाज वाटते असा समज पश्याने करुन घेतलाय. म्हणूनच परस्पर स्वत: वकीलांकडे जाऊन पश्याने अंजीला घटस्फोटाची नोटीस दिलीय. त्याला वाटतंय तो अंजीला यातून मुक्त करतोय. पण तसं अजिबात नाहीय. उलट अंजी पश्याच्या हळूहळू प्रेमात पडलीय. त्यामुळे आता पश्याने अंजीला हे घटस्फोटाच्या नोटीसचं गिफ्ट दिल्याने तिच्या पायाखालची जमिन सरकलीय. आता पुढे काय घडणार, अंजी आणि पश्या विभक्त होणार का, घरात हे समजल्यावर काय होईल हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive