By  
on  

पडद्यामागच्या कलाकारांसाठी 'माझ्या नवऱ्याची बायको' टीमचं खास दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळी म्हटलं कि एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी मालिकांमध्ये सुद्धा घडताना दिसणार आहे. पण ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी आहे, 

माझ्या नव-याची बायको ही धम्माल आणि कुरघोडी यांनी भरपूर असलेली मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतली गुरुनाथ, राधिका आणि शनाया या पात्रांसोबतच इतर व्यक्तिरेखांनीसुध्दा आपली ओळख निर्माण केली आहे. 

सध्या मालिकेत एक भन्नाट ट्रॅक सुरु आहे. गुरनाथची पूर्व पत्नी राधिका आणि आत्ताची पत्नी शनाया या दोघी गुरुनाथ विरोधात एकत्र उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना त्याला चांगलाच धडा शिकवायचाय.


शनाया राधिका मसालेची CEO झाल्यानंतरच तिच राधिकामसाले मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे. राधिका - आनंद भावोजी आणि  शनाया - सौमित्र यांची भाऊबीज मालिकेत पाहायला मिळेल.

 

लॉकडाऊन नंतर शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती आणि गेली ४ महिने सर्व crew सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱ्याची बायकोच्या टीम ने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. ४ दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश आहेत कारण त्यांना ४ दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive