‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. दररोज ह्या मालिकेत नवं वळण पाहायला मिळतंय. संजना व अनिरुध्दच्या नात्याविषयी समजल्यानंतर खचून न जाता पुन्हा उमेदीने उभं राहण्याचा ठाम निश्चय अरुंधतीने केला आहे. अनिरुध्द आणि संजनाचं नातं आता संपूर्ण देशमुख परिवारासमोर आलं आहे, आप्पा आणि आईने अनिरुध्दच्या कानाखाली मारत त्याला जाब विचारलाय. पण अहंकारी आणि हेखेखोर अनिरुध्द काही आपली चूक मान्य करायलाच तयार नाही. उलट आपल्या सर्व चुकांचं खापर तो अरुंधतीवर फोडतोय. पण या तमाशात संपूर्ण कुटुंब अरुंधतीच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.
मुलांदेखत आई-आप्पानी अनिरुध्दला मारल्यानंतर तो आणखीनच चेकाळलाय व आता अरुंधती कशी चुकीची आहे हे सांगत सुटलाय. पण सर्व अरुंधतीच्या बाजूने आहेत हे अनिरध्दला पाहवत नाहीय. त्याचा पुरषी अहंकार तो अरुंधतीसमोर गाजवू पाहतोय. तिला घराबाहेर काढतोय.इतकंच नाही तर त्याने तिच्यावर हातही उचललाय.पण आता अरुंधती खचून गेलेली नाही तर ती पुन्हा उभी राहिलीय. अनिरुध्दचा हात पकडून तिने त्याला जबरदस्त उत्तर दिलं आहे.
आता कुटुंबासाठी नेहमीच उभी ठाकणारी अरुंधती कोणतं पाऊल उचलणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.