By  
on  

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेत आजी-आप्पांचा पुनश्च विवाहसोहळा

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका रसिक प्रे७कांची आवडती आहे. सध्या ह्या मालिकेत सईच्या आजी-आप्पांच्या पुनश्च विवाहसोहळ्याची म्हणजेच लग्नाच्या वाढदिवसाची धामधूम पाहायला मिळतेय. पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा  ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

 

परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या नचिकेत आणि सईची प्रेमकथा उलगडताना दिसते. आजी आणि अप्पांच्या लग्नानंतर आता मालिकेत दिवाळीची लगबग पाहायला मिळतेय.

सध्या मालिकेत दिवाळी साजरी करतानाच सईला नचिकेत परत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार करत असल्याचे समजते. अचानक मिळालेल्या या धक्क्याने सई हादरून जाते. नचिकेत लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे समजताच सईची काय प्रतिक्रिया असेल? हा धक्का ती कशी सहन करणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive