By  
on  

सिंगिंग स्टारच्या मंचावर आनंद शिंदेंच्या उपस्थितीत रंगमार गाण्यांची मैफील

सिंगिंग स्टारमध्ये या आठवड्यात आनंद शिंदे विशेष भाग होणार आहे. लोकसंगीताचा बुलंद आवाज म्हणजेच आनंद शिंदे स्वतः 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर येणार आहेत. स्वानंदी आवाज वाढावं डीजे तर यशोमान पोरी जरा जपून दांडा धार अशी उडती गाणी गाणार आहेत. एवढंच नाही तर पाऊले चालती आणि तू लाख इबादत करले ही गाणी आनंद शिंदे मंचावर स्पर्धक आणि परीक्षकांबरोबर सादर करणार आहेत. 

दिवाळीच्या आठवड्यातच आनंद शिंदे यांचं मंचावर आगमन झाल्यामुळे सिंगिंग स्टार मध्ये या आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. 
पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' आनंद शिंदे विशेष भाग १३ आणि १४ नोव्हेंबर रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive