अनेक नवनव्या वळणांमुळे आई कुठे काय करते मालिकेची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय, या लोकप्रिय मालिकेतली रंजक वळणं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतायत. संजना व अनिरुध्दच्या नात्याबद्दल आता आई-आप्पांना कळल्यानंतर अनिरुध्द व अरुंधतीच्या जीवनात बरीच उलथापालथ झालीय.सतत अरुंधतीला दोष लावणारा तिला पाण्यात पाहणारा तिचा पती अनिरुध्द देशमुख अद्यापही आपण चुकलो हे काही मान्य करायला तयार नाही.
अनिरुध्द आता अरुंधतीसोबत घटस्फोट घेणार म्हटल्यावर संजनाचा तोरा भलताच वाढलाय. ती देशमुखांच्याच घरात येऊन अरुंधतीला दुषणं लावतेय. पण आप्पा मात्र हे अजिबातच सहन करत नाहीत आणि तिच्यावर पलटवार करत सांगतात, हे देशमुखांचं घर आहे अनिरुध्दचं नाही. घराचा मालकी हक्क अरुंधतीच्या नावे करतायत हेसुध्दा आप्पा संजनाला यावेळी सांगतात व ती क्षणार्धात हादरुन जाते.
हे सर्व ऐकल्यानंतर आता संजना काय करणार, अनिरुध्द आता आणखी कसा चेकाळणार व मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे जाणून घेण्यासाठी पाहत .राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता