By  
on  

होणाऱ्या बाळाच्या काळजीपोटी रणजित संजीवनीला थांबवणार का? पाहा Video

संजु – रणजीत यांच्या प्रेमकथेची सुरुवात अपघाताने झाली. संजीवनी आणि तिचा फौजदार म्हणजेच रणजीत यांचं नातं जुळल, ते लग्न बंधनात अडकले. अतिशय अल्लड अशी संजु जिची खूप साधी स्वप्नं आहेत तिला लग्नानंतर अत्यंत लहान वयात जीवनाची खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे या सत्यापासून ती अनभिज्ञ होती

ढाले पाटील यांच्या घरातील चालीरीती, नियम सांभाळताना ती हळूहळू संपूर्ण कुटुंबाचा आधार बनली. या खडतर प्रवासात तिने नवर्‍याचेच नाही तर सासूचे प्रेम आणि विश्वास देखील मिळवला. पण इतकं करून देखील आपल्याच माणसाने घेतलेल्या एका निर्णयामुळे फुलपाखरासारखे आयुष्य जगणार्‍या संजीवनीसमोर एक प्रश्न कायम उभा राहिला... तो म्हणजे घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य.आणि ज्याची भीती तिला होती तेच घडलं. संजुच्या वयाचे सत्य रणजीत आणि ढाले पाटील कुटुंबासमोर आले  आहे. तिचं सगळं आयुष्य यामुळे बदललं आहे .

संपूर्ण ढाले पाटलांची कुटुंबाची अब्रू या प्रकरणाने धुळीला मिळाली आहे.जी चूक संजुकडून कोणाच्या तरी सांगण्यावरुन घडली त्या चुकीची माफी संजुला मिळेल ?संजीवनी घेणार ढाले-पाटीलांचं घर सोडून जाण्याचा निर्णय. होणाऱ्या मुलाच्या काळजीपोटी रणजित संजीवनीला थांबवणार का?

 

 

संजीवनी आणि रणजीत हे दोघं कसे नियतीवर मात करुन  राजा – राणीचा संसार करतील ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive