आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी कीर्ती शिक्षणाचं महत्त्व नसलेल्या घरात संसार करतेय. आठवी नापास शुभमसोबत तिने संसार थाटलाय. त्याचा चांगुलपणा पाहून ती त्याला त्याच्या प्रत्येक कामात साथ देतेय. एका ऑर्डरनिमित्त शुभमसोबत आलेली किर्ती तिथे त्याला मिठाई बनविण्यासाठी मदत करतेय. तेव्हा त्याची मदत करतावा खराब कढई ती घासून देतेय. इतक्यात अचानक किर्चीची एक मैत्रिण तिच्यासमोर येत व ती किर्तीला पाहून अवाक् होते.
किर्ती मैत्रिणीला पाहून बिलगून रडायला लागते. तिलाही तिची अवस्था कळते. त्याचदरम्यान किर्तीच्या स्वप्नाविषयी शुभला समजतं. एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. आता किर्तीला लाभेल का शुभमची साथ, तो करेल का तिचं स्वप्न पूर्ण, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘फुलाला सुगंध मातीचा’ दररोज रात्री ८.३० वाजता