'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरी सगळ्यांचचं लक्ष वेधते. गौरीचा साधाभोळा स्वभाव हीच तिच्या या व्यक्तिरेखेची ओळख आहे. पण हीच गौरी अचानक रुद्रावतार धारण करणार आहे, हे सांगून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला या रुद्रावताराची झलक या व्हिडीओत पाहायला मिळेल.
जयदीपच्या आयुष्यात ज्योतिकाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतलीय आणि जयदीपला मिळवण्यासाठी ती आता हरप्रकारे प्रयत्न करतेय. जयदीप आणि ज्योतिकाची पार्टी ऐन रंगात असताना अचानक गौरी तिथे येते व नुसती येतच नाही तर दारुच्या नशेतली गौरी चंडीका देवी अवतार धारण करत ज्योतिकाच्या कानाखाली लगावून देते. मग गौरी तिला सुनावतेही की काय सारखं जयदीप-जयदीप लावलं आहेस. मी आहे गौरी जयदीप शिर्के -पाटील. आता गौरीच्या या बेताल वागण्याचा परिणान काय होणार हे येत्या महाएपिसोडमध्ये लवकरच कळेल.
जयदीप ज्योतिकासमोर गौरीला समजून घेणार की बाहेरचा रस्ता दाखवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.